आज आपण बेसिक वायरींगचे नियम जाणून घेऊया
मूलभूत विद्युत ज्ञान
आज आपण बेसिक वायरींगचे नियम जाणून घेऊया
सुरक्षिततेचे नियम :-
1. विजेचे काम करतांना सुरक्षिततेसंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे.2 अपघात दैवयोगाने घडत नाहीत, तर अपघातास आपणच कारणीभूत असतो, याची
जाणीव प्रत्येक कामगाराने ठेवावी.
3. आपल्याप्रमाणेच इतरांच्या जीविताचेही महत्त्व अनन्य साधारण आहे. ह्याचीही
जाणीव ठेवावी.
4. काम करतांना कपडे घट्ट असावेत.
5. पुरेशा माहिती नसलेल्या कामाची प्रथम माहिती करुन घ्यावी व नंतरच ते काम ।
करावे.
6. योग्य त्या अवजारांचा उपयोग करावा.
7. चालू लाईनवर काम करतांना प्रथम अवजार व त्यावरील आच्छादने (insulations)
तपासून पहावीत.
8. खांबावर काम करतांना सुरक्षित पट्टय़ांचा (Safety Belts) उपयोग करावा.
9. खांबावरील दुरुस्तीच्या वेळी विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद आहे याची खात्री करुन ।
घ्यावी. अधिक सुरक्षितता म्हणून तेथील तारा दुसऱ्या तारेच्या मदतीने शॉर्ट करुन
ठेवाव्यात.
10. शिडीवरुन वर चढतांना ती पुरेशी मजबूत आहे ह्याची खात्री करून घ्यावी.
11. शिडीखाली कमीत कमी एक मदतनीस अवश्य असावा.
12. सॉकेटमधून प्लग बाहेर काढताना तारांना ओढून काढू नये. प्रथम स्विच बंद करावा
नंतर प्लगला धरून बाहेर ओढावे.
13 कोणत्याही तारेस विद्युत पुरवठा करण्यापूर्वी तो पूर्णपणे सुरक्षित आहे ह्याची खात्री
करून घ्यावी.
14 इलेक्ट्रोलाईट तयार करतांना पाण्यात आम्ल टाकावे. याच्या उलट क्रिया करू
नये.
15 बॅटरी चार्जिंगच्या खोलीत दिव्याची ज्योत नेऊ नये.
16 विद्युत साधानांना आग लागल्यास त्यावर पाणी राकू नये, अग्निशामकांचा उपयोग
करावा अथवा मातीने आग विझवावी.
प्रथमोपचार व अग्निशामके
विजेशी संबंध येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस विजेच्या धक्क्यापासून होणारे अपाय व त्यावरील उपाय हयांची माहिती असणे आवश्यक आहे. कारण अत्यंत लहानशा चुकीनेही जीवित ।
धोक्यात येण्याचा संभव असतो. प्रथमोपचार म्हणजे वैद्यकीय मदत मिळेपर्यत रोग्यावर करण्यात ।
येणारे उपचार विजेमुळे माणसास तीन प्रकारच्या जखमा होतात
1) भाजल्यामुळे होणाया।जखमा2) साध्या जखमा
3) रक्ताभिसरण क्रियेवर होणारा परिणाम. विद्युत् प्रवाहाने बसणाऱ्या
धक्क्याने गांभीर्य शरिरातून वाहणारा विजेचा प्रवाह, विजेचा दाब, जमिनीशी येणारा संबंध ।
शरीराचा तारेशी होणारा स्पर्श ह्यावर अवलंबून असतो. तीव्रतेचा विचार केल्यास डी. सी.
पेक्षा ए. सी. अधिक धोकादायक असतो.
मानवी शरिराचा विद्युत विरोध व्यक्ती व स्थितीपरत्वे 500 ते 40, 000 ओहमच्या आस-
पास असतो. परंतु आकडेमोडीसाठी तो 1000 ओहम धरतात. उपलब्ध आकडेवारीवरुन असे
दिसून येते की,मोठया दाबापेक्षा कमी दाबावरच अपघात अधिक घडून येतात. धक्कयाची तीव्रता
प्रवाह व वेळ हयावर अवलंबून असते. साधारणपणे 30 मि. अॅ. प्रवाह 1 सेकंद, 300 मि. अॅ.
50 मि.सें. व 500 मि. अॅ 30 मि. सें. शरिरातून वाहिल्यास धोका संभवत नाही. हयापेक्षा अधिक
प्रवाह किंवा वेळ वाढल्यास धोक्याची शक्यता वाढते. खालील आलेखावरून हे अधिक
स्पष्ट होईल.
![]() |
| आकृती 3.1 |
झोन 1 - शॉक जाणवत नाही.
झोन 2 - जाणवतो पण धोकादायक नाही.
झोन 3 - हृदयक्रियेवर परिणाम नाही.
झोन 4 - हृदय क्रियेवर परिणाम शक्यता 50%
झोन 5 - हृदय क्रियेवर परिणाम, शक्यता 50% पेक्षा अधिक.
हे परिणाम ए. सी. 50 सा. फ्री वर प्रौढ व्यक्तिस होणारे आहेत. विजेचा धक्का बसण्याची
और कारणे असू शकतात. 1) आत्मविश्वासाचा अभाव.2) फाजील आत्मविश्वास.3) अज्ञान
कारणाकडे लक्ष दिल्यास अपघाताची संख्या घटेल. एखादा कामगार विजेच्या तारेला
चिकटून राहिला असेल तर त्याला सोडविणे सर्वात महत्त्वाचे. ह्याकरीता कोरड्या फळीवर
उप राहून अशा व्यक्तीस ओढावे. किंवा दोरी, कापड अशा कोणत्याही कोरड्या अवाहकाने त्याला
अदावे. प्रत्येक वेळी विजेचा पुरवठा बंद करणे शक्य असतेच असे नाही. मात्र शक्य असेल
तेथे मेनस्विच प्रथम बंद करावा.
घायाळ इसमास विद्युत् प्रवाहापासून अलग केल्यावर त्याचे कपडे पेटले असतील तर
ते विझवावेत. डॉक्टरांना निरोप पाठविण्यापूर्वी त्याचा श्वासोच्छवास चालू आहे की नाही ते
पहावे. जर चासोच्छवास बंद असेल तर ताबडतोब कृत्रिम उपयाने वासोच्छवास सुरु करण्याचा
प्रयत्न करावा, हे सर्व करताना उपाय करणाऱ्याच्या अंगी प्रसंगावधान, परिस्थितीचे आकलन
अशा गुणांची आवश्यकता असते. कृत्रिम श्वासोच्छवास देण्याच्या परिणामकारक पध्दती पुढे
दिल्या आहेत.
1. शेफरची पध्दत: हया पध्दतीचा वापर जर रोग्यास पाठीवर जखमा झाल्या असतील
तर होतो. हयामध्ये पायाळ इसमास पोटावर झोपवावे. त्याची मान एका बाजूला वळवावी. आपण
स्वतः गुडघ्यावर त्याच्या कमरेच्या जवळ बसावे.आकृती 3.2 पहा. आपल्या दोन्ही हाताची बोटे।
![]() |
| आकृती 3.2 |
त्याच्या सर्वात खालच्या बागडीजवळ अशा रितीने ठेवावीत को आपले ताठ पसरलेले अंगठे।
रोग्याच्या पाठीच्या कण्याची समातेर येतील व बोटे बरगडीच्या दिशेत येतील.
नंतर हळूहळू त्याच्या पाठीवर भार धावा. साधारणपणे दोन सेकंद त्याची पाठ दाबून
धरावी. नंतर त्याच्या पाठीवरील दाब हडन कमी करावा. ज्याप्रमाणे एका मिनिटात सुमारे।
15.वेळा ही क्रिया करावी, असे केल्याने पायाळ इसमाच्या बरगडया आकुचन प्रसरण पावून
हवा आत बाहेर जाते व श्वासोच्छ्वास सुरु होतो. नैसर्गिक श्वासोच्छ्वास सुरु होण्यास बात
वेळ लागण्याची शक्यता असते. तरी न कंटाळता ही क्रिया चालू ठेवणे आवश्यक आहे
श्वासोच्छवास सुरु झाल्यावरही ही क्रिया चालू ठेवावी. नैसर्गिक व आपली क्रिया यांच्यात
समकालीनता (Synchronizing) व परस्परपूरकता (Complementing) साधली जाईल
हयाकडे लक्ष द्यावे. नैसर्गिक श्वासोच्छवास पूर्णपणे सुरु झाल्याची खात्री पटल्यावरच आपली
क्रिया थांबवावी. नैसर्गिक श्वासोच्छ्वास सुरु झाल्यावरही तो काही वेळा थांबण्याची शक्यता।
असते. म्हणून रोग्यावर बारकाईने लक्ष ठेवावे. नैसर्गिक श्वासोच्छवास बंद पडल्यास परत
कृत्रिम श्वासोच्छ्वासाची क्रिया सुरु करावी. रोगी बेशुध्द अवस्थेत असताना त्याला कोणतेही
पेय देऊ नये. कारण पेय घशात अडकले तर श्वासोच्छ्वासास अडथळा निर्माण होतो.
2 नेल्सनची पध्दत: जर रोग्याला पुढील बाजूस जखम झाली असेल, पोटावर झोपविणे
शक्य नसेल तर, हया पध्दतीने प्रथमोपचार करावा. रोग्याला पाठीवर झोपवा. त्याचे कपडे सैल
![]() |
| आकृती 3.3 |
त्यामुळे त्याची जीभ आत गेली असल्यास ती बाहेर ओढा, तोंडातील पान तंबाखू काढून टाका.
वरील आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण आपले गुडघे मुडपून रोग्याच्या डोक्या-
जवळ बसावे. कोपराजवळ त्याचे हात पकडून ते सरळ करावेत व जमिनीला टेकविण्याचा प्रयत्न
करावा.2-3 सेकंद त्याच अवस्थेत हात दाबून ठेवावेत. नंतर त्याचे हात मुडपून ते मूळ अवस्थेत
घ्या. व छातीवर दाब पडेल अशा सावकाश रितीने दाबा. हात वर घेतले असता छाती प्रसरण
पावेल व दाबले असता आकुंचन पावेल. हया पध्दतीचा वापर 15-20 मिनिटे करावा. तोपर्यंत
नैसर्गिक श्वासोच्छवास सुरु न झाल्यारा पुढे ही क्रिया चालू ठेवावी.
3 तोंडाने कृत्रिम श्वासोच्छवास : हया पध्दतीत रोग्याला पाठीवर झोपवावे, त्याचे तोंड
वर सांगितल्याप्रमाणे स्वच्छ करावे, एक हात त्याच्या मानेखाली देऊन दुसरा नाकावर ठेवावा.
![]() |
| आकृती 3.4 |
रोग्याच्या तोंडावर पातळसा रुमाल टाकणे शक्य झाल्यास टाकावा. मात्र रुमालाचा आपल्या
प्रयत्नात अडथळा होऊ नये.
आपले तोंड रोग्याच्या तोंडात घालून त्याच्या नाकपुडया दाबाव्यात व जोराने त्याच्या
तोंडात हवा फुकावी. त्यामुळे रोग्याच्या छातीत हवा भरली जाईल. नंतर आपले तोंड दूर करुन
हवा बाहेर पडू द्यावी. जर हवा बाहेर पडत नसेल तर हवेचा मार्ग तपासून पहावा. त्यासाठी
त्याला एका कुशीवर झोपवावे. त्याच्या मानेवर थोडेसे मारावे म्हणजे त्याच्या घशात काही।
अडकले असेल तर ते खाली पडेल.
साधारणपणे 5 सेकंदात एकदा ही क्रिया करावी. रोगी जखमी असेल तर मात्र इतक्या
वेगाने ही क्रिया करु नये. हया पध्दतीने उपचार करण्यास काहीना संकोच अथवा घाण वाटण्याची
शक्यता आहे. परंतु रोग्याच्या जीवनाचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. व रोग्याच्या दृष्टीने ही।
पध्दत म्हणजे kiss of the life होय.
रोग्याला डॉक्टरच्या स्वाधीन केल्यावर डॉक्टरला अपघाताचे स्वरुप व दिलेले
प्रथमोपचार यांची माहिती द्यावी. हया ठिकाणी प्रथमोपचार करणाऱ्याचे काम संपते. प्रथमोपचार
करणाऱ्याने शांत चित्त ठेऊन झटपट हालचाली कराव्यात. परिस्थितीने घाबरुन न जाता सातत्याने।
प्रयत्न केल्यास विजेचा धक्का बसलेला इसम सहसा दगावत नाही. ।
अग्निशामके (Fire extinguishers)
आगीचे ठोकळमानाने तीन प्रकारात वर्गीकरण करतात.
1) अ वर्ग आग : कागद, लाकूड, कपडे, ज्यूट इत्यादीना लागणारी आग.
2) ब वर्ग आग : ज्वालाग्राही द्रावांना लागणारी आग जसे पेट्रोल, रॉकेल.
3) क वर्ग आग : ज्वालायाही वायूंना लागणारी आग, जसे स्वयंपाकाचा गॅस किंवा।
इतर ज्वालाग्राही वाय. हया शिवाय इलेक्ट्रीकल वस्तुना व इलक्ट्रीकल कारणामुळे लागणारी
आग, असे आगीचे वर्गीकरण केले जाते.
![]() |
| आकृती 3.5 |
आग जर वायरिंगला लागली असेल, किंवा वायरिंगमुळे लागली असेल तर, विद्युत्
पुरवठा प्रथम बंद करावा. विजेवर चालणारे कारखाने, सब स्टेशन्स, पॉवर स्टेशन्स् अशा ठिकाणी
अग्निशामके नेहमी सुस्थितीत ठेवावीत.
1) फायर बकेटस् : अग्निशामकाचा साधा सोपा प्रकार म्हणजे फायर बकेटस. वाळने
भरलेल्या बादल्या. हया बादल्या सहज हाताला येतील अशा बेताने टांगून ठेवाव्यात. त्यामध्ये
बारीक वाळू भरुन ठेवावी. बादल्यांचा रंग लाल व त्यावर FIRE ही अक्षरे पांढरी असावीत.
जिल2) सोडा अॅसिड अग्निशामक : हया अग्निशामकाच्या वरच्या बाजूस एक टोपी असते.
टोपी फिरवून दूर करावी. बादलीत 9 लिटर स्वच्छ पाणी घेऊन त्यात दिलेली पावडर एकजीव
करावी. हे मिश्रण शामकामध्ये खुणे इतके भरावे. मग अॅसिडच्या बाटलीचे नळकांडे त्याचे ।
निमुळते टोक खाली जाईल अशा रितीने आत सोडावे. व टोपी घट्ट बसवावी. वरच्या बाजूस ।
असलेल्या नॉबचा दाब सर्वसाधारण परिस्थितीत बाटलीवर पडू नये. यासाठी नॉब नेहमी ताण-
लेल्या अवस्थेत असावा. तो तसा रहावा म्हणून गार्डची सोय असते.
आग लागताच शामक आगीजवळ न्यावा. सेफ गार्ड बाजूस करुन नॉब जोराने खाली।
मारावा, किंवा शामक उलटा करुन नॉबवर आपटावा. म्हणजे आतील गॅस फुटून गॅसमिश्रीत।
पाण्याचा फवारा बाहेर पडेल. तो आगीच्या मुळाशी मारावा. हा शामक 'अ' वर्ग आगीसाठी
उपयुक्त.
3) पाणी-सी ओ टू शामक (CO2) : हयामध्ये पाणी व कार्बन डाय ऑक्साईडच्या
कुपीचा वापर केलेला असतो. शामकामध्ये पाणी भरावे व कार्बन डाय ऑक्साईडची कुपी बसवून
टोपी बसवावी. शामक वापरतांना त्याच्या डोक्यावरची क्लिप काढून नॉब खाली दाबावा, म्हणजे
गॅस व पाणी बाहेर येईल. त्याचा फवारा आगीचे मुळाशी मारावा. अग्निशामक सुस्थितीत ।
राहण्यासाठी त्याची तपासणी दर दोन ते तीन महिन्यांनी करावी. सी ओटूच्या कुपीवर वजन |
दिलेले असते. हे वजन जर २० टक्कयापेक्षा अधिक घटले तर कुपी बदलावी.'अ' वर्ग आगीसाठी
उपयुक्त आहे.
4) फोम शामक : हा शामक भरण्यासाठी दोन प्रकारच्या पावडर्स लागतात. ह्यांचा रंग
पांढरा व पिवळा असतो. हया दोन्ही पावडर्स गरम पाण्यात मिसळून पांढऱ्या पावडरचे मिश्रण ।
नळकांडयात भरावे.व पिवळया पावडरचे मिश्रण सिलिंडरमध्ये भरावे.मग नळकांडे सिलिंडरमध्ये
सोडावे. जेंव्हा दोन्ही मिश्रण एकत्र येतात तेव्हा दाबाने फेस बाहेर पडतो. तो आगीच्या मुळाशी
मारावा.
5) पावडर टाईप शामक : हे शामक निरनिराळया आकारात मिळतात. ह्यामध्येही CO2
ची कुपी असते. व पाण्याऐवजी अग्निशामक पावडर असते. हा सिलिंडर पूर्ण कोरडा करुनच
भरावा. व पाणी सी ओटू शामकाप्रमाणे वापरावा. कुपीचे वजन दर तीन महिन्यांनी करावे.20%
पेक्षा अधिक घटल्यास कुपी बदलावी. 'क' वर्ग आगीसाठी उपयुक्त.
6) सी. ओटू शामक : हया शामकामध्ये कार्बन डाय ऑक्साईड भरलेला असतो.
शामकाच्या तोंडाशी असलेला व्हॉल्व्ह फिरवून गॅस बाहेर येतो. व आग विझते. सिलिंडर वाप-
रल्यावर तो किती खर्च झाला व किती शिल्लक आहे. हयाचा अंदाज सिलिंडरचे वजन करुन ।
घ्यावा. 'क' वर्ग आगीसाठी उपयुक्त. हा वायु उदासीन व विजेचा अवाहक आहे. त्यामुळे हाय ।
व्होल्टेज वायरिंग, सबस्टेशन्स ऑईल प्लॅन्ट इत्यादिसाठी उपयुक्त.
7) कार्बन टेट्रॉक्लोराईड शामक : हयामध्ये धातुचे नळकांडे असते व त्यात कार्बन
टेट्रॉक्लोराईडचा द्राव भरलेला असतो. जेंव्हा हा द्राव नळकांडयातून मुक्त होतो. तेव्हा द्रावाचे
वायूत रुपांतर होते. हा वायु हवेपेक्षा जड असतो. तो आगीवर एक प्रकारचे आवरण निर्माण
करतो. व आग विझते. विजेपासून लागणाऱ्या आगीसाठी उपयुक्त. मात्र ह्याचा वापर बंदिस्त जागेत
करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण हा वायु विषारी आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा