गुढी पाडवा 2020
गुढी पाडवा 25 मार्च 2020
नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेवर्ष प्रतिपदा.
तिथी प्रारंभ होतो - 14:57 (24 मार्च 2020)
तिथी संपेल - 17:26 (25 मार्च 2020)
चैत्र महिना
गुढीपाडवा:
नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे
वर्षप्रतिपदा. या दिवसाला आपण गुढीपाडवा म्हणतो. या दिवशी
घरोघर गुढी उभारतात. गुढीची पूजा, सरस्वतीची पूजा आणि
नवीन पंचांग श्रवण करून लोक
त्याअगोदर निंबभक्षण करतात.
निंबभक्षणाने आरोग्य मिळते.
पाडव्याच्या दिवशी एकमेकांशी
प्रेमाने बोलावे. एकमेकांचे
शुभचिंतन करावे. हा दिवस
आनंदात घालवावा म्हणजे सबंध
वर्ष सुखाचे जाते असे म्हणतात.
गुढीपाडवा हा वर्षातील साडेतीन
मुहूर्तापैकी एक मुहूर्त. या दिवशी शुभकार्याला आरंभ करावा. नवे नवे
संकल्प करावेत आणि ते प्रयत्नपूर्वक पार पाडण्यास सुरुवात
करावी. या दिवसाच्या अनेक कथा आहेत. ब्रह्मदेवाने सृष्टिरचनेचा
प्रारंभ याच दिवशी केला. वसुराजाने इंद्रध्वजाची पूजा केली तीही
याच दिवशी. याच दिवशी रामाने रावणवधानंतर अयोध्येत प्रवेश
केल. शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला. यामुळे हा दिवस
विजयदिन म्हणूनही आळखला जातो.
कालगणना :-
'गढीपाडव्याच्या दिवशी, पंचांग वाचण्याची आणि ऐकण्याचीप्रथा आहे. पाडव्यापासून शालिवाहन शकाचे नवे वर्ष सुरू होते.
![]() |
| गुढी |
गुढी हा त्याचा विजयध्वज आहे.
इस वी सन शालिवाहन शके ७८ व्या वर्षी सुरू झाला. ( दिनांक ३ मार्च इ. स. ७८) म्हणून इस वी सन आणि शालि वाहन शक यामध्ये ७८ वर्षांचे अंतर असते.इसवी सनाची कालगणना येशू खिस्ताच्या नामकरण दिवसापासून खिस्ती लोक मानतात. सध्या साऱ्या जगभर हीच कालगणना मुख्यतः चालू आहे.इसवी सन आणि शालिवाहन शक यांखेरीज आणखी एक कालगणना आहे.
इसवी सनपूर्वी ५७ व्या वर्षी सुरू झालेला विक्रम संवत्, महंमद पैगंबरांच्या मक्केहून मदिनेला स्थलान्तर करण्याच्या दिवसापासून (दि. १६ जुलैस ६२२ पासून) मुसलमानांचा हिजरी सन, फसली सन, बंगाली सन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून (इ. स. १६७४ पासून) सुरू झालेला शिवशक, इ. स. पूर्व ५४३ या बुद्ध-निर्वाणापासून वैशाखी पौर्णिमेला सुरू झालेली बुद्ध कालगणना, यांखेरीज पूर्वी युधिष्ठिराने सुरू केलेला इंद्रप्रस्थशक, नागार्जुनशक, वगैरे प्रकारच्या कालगणना पद्धती
आहेत.
गुढीपाडवा अनेक ठिकाणी साजरा करतात ?
| New Year |
गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री घरातले सगळे दागदागिने, मौल्यवान रत्ने देवासमोर मांडुन ठेवतात. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर मोठी माणसंच उठतात आणि देव्हाऱ्यातील लक्ष्मीची पूजा दीप-धूप लावून करतात. मग एक गंमत असते. घरातली जेवढी म्हणून माणसं असतात नाती एकेक करून डोळे मिटून देव्हाच्यापर्यंत जातात आणि तिथं पोहोचल्यावर लक्ष्मीचं दागदागिन्यांचं दर्शन घेतात. मग प्रसाद वाटला जातो."
"बाबा, असं का करतात ते?" चित्रानं विचारलं."अगं, त्यामागे एक समजूत आहे आणि ती म्हणजे घरातल्या संपत्तीवर सकाळी उठल्या उठल्यानजर पडली की पूर्ण वर्ष सुखा-समाधानात जातं. नवीन वर्षाचातो पहिलाच दिवस असत,ना?"बाबांनी सांगितलं,
"चित्रा, ताई, माझा स्वयंपाक झालाय. बाबांना म्हणावं नेवैद्य दाखवा." स्वयंपाकघरातून आई ओरडली,
नेवैद्य दाखवला की चित्राला तिच्या गालासारख्या फुगलेल्या पुऱ्या आणि ताईच्या
स्वभावासारखी गोड बासुंदी मिळेल."बाबा उठत म्हणाले."धावा, चला मग गुढी पण खाली काढणार ?
मी साखरेची माळ खाणार." चित्रा म्हणाली."चित्रा बेटा, गुढी आता उतरवायची नसते.
सूर्यास्ताअगोदर गुढीची हळदी-कुंकू, अक्षता वाहून नारळ वाढवून गुढी उतरावी असं शास्त्र सांगतं.
मग तूच आता सांग पाह, आता गुढी उतरायची का?"
"नाही. नंतर उतरव्या. चलाबाबा, आई बोलवते आहे."
"चला चला.ताई चल."बाबाम्हणाले आणि त्यांच्या पाठोपाठ बाबास्वयंपाकघरात गेले.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा