New

आपला राजा छत्रपती संभाजी महाराज

धगधगता सूर्याचा संग्राम नक्की वाचावा  

   
       मी कुलदीप देशमुख(माहुली) गेल्या 2 वर्षापासुन झी मराठी वरील रात्री 9 वाजता लागणारी *स्वराज्य रक्षक संभाजी महाराज* ही मालिका न चुकता बघत आहे. आणि फक्त काही दिवसात मालिकाचा शेवट होणार आहे, म्हणून मी लिहिण्याचे ठरवले.छत्रपती शंभुराजेना फितुरीमुळे अटक झालेली आहे, सध्या हे अखेरचे प्रसंग मालिकेत दाखवले जात आहे... या पुढील फक्त उरलेले 7 एपिसोड आपण सगळ्यांनी बघावे. म्हणून मी हा लेख लिहीत आहे, कारण अजूनही  महाराष्टात जन्मलेल्या लोकांना माहीत नाही की श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. म्हणजे आपलं स्वराज आणि तेच स्वराज छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे जेष्ठ पुत्र स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर संभाजीराजे यांनी 1 नाही 2 नाही  तब्बल 9 वर्ष औरंगजेब सारख्या सैतान्याचा 5 लाख मोघली सैन्याशी, इंग्रज, सिद्धी, डच, पोर्तुगीज, आदिलशाही, कुतुबशाही,एकाचं वेळी सामना केला आणि हा शिवपुत्र छावा कधीच हरला नाही की डगमगला नाही. नियतीने जवळचे माणसं हेरावून घेतले (कोंडाजी बाबा, सरसेनापती हंबीर मामा, हेर प्रमुख बहिर्जी नाईक काका, धाराऊ, मातोश्री पुतळाबाई) तरी स्वराजासाठी, शिवरायांचा अस्मितेसाठी,

महाराष्ट्राच्या माती साठी शंभुराजे लढत राहिले.
छत्रपती संभाजी महाराज

    मावळ्यांना सोबत घेऊन.अहोरात्र छावा या सह्याद्रीचा दऱ्या खोऱ्यात वादळ वाऱ्यासारखा घोंगावत राहिला. शेवटी जन्मापासूनच मरण पाठीशी घेऊन हिंडणाऱ्या शिवपुत्राला व त्यांचा मित्र कविकलशाला नियतीने, आपल्याच माणसांनी पैशाचा मोहापायी पकडून दिले. तरी हा छावा शिवपुत्र संभाजी डगमगला नाही. 1 फेब्रुवारी 1689 ते 11 मार्च 1689 या काळात पूर्ण 40 दिवस, जगाच्या इतिहासातील कोणत्याच राजाने हा दुर्दैव अत्याचार सहन केला नसेल, कोणाच्याच भाळी हा सैतानी अत्याचार लिहिला नसेल... अरे नुसता विचार केला तरी डोळ्यात पाणी येत, किती सोसलं असेल त्या जाणत्या राजाचा छाव्याने किती... शेवटी औरंगजेबाचा डोळ्यात पाणी आलं.
         शंभूराजेचं शौर्य आणि पराक्रम बघून आणि म्हटला की मी डोळे काढले, तरी संभाजीची नजर झुकली नाही. माझा समोर मी जीभ छाटली तरी त्याने रहम नाही मागितली जगण्यासाठी. मी पाय कापले तरी  टेकले नाहीत गुडघे माझ्या समोर... या अल्लाह का नाही जन्माला आला एक  पण संभाजी माझा घरात. जर एक पुत्र तरी असा जन्माला आला असता तर मी जगावर राज्य केलं असत. तेव्हा शंभूराजे म्हणाले.अरे औरंगजेब... कसा येईल संभाजी तुझा पोटी... सख्ख्या बापाला तू विष देऊन मारणारा, भावाची खुलेआम कत्तल करणारा... कसा येईल संभाजी तुझा पोटी हा संभाजी जन्माला येईल फक्त शिवरायांच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मातीत... जगदंब, जगदंब, जगदंब म्हणत छत्रपती संभाजी महाराजांनी आपला देह ठेवला आणि त्यांच्या मृत्यू नंतर महाराष्ट्राच्या गवताला ही भाले फुटले... अनेक संभाजी... संताजी, धनाजी च्या रूपाने जन्माला आले. आणि शेवटी औरंगजेबाचे महाराष्ट्र जिकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले, आणि या महाराष्ट्रातच त्याची कबर खोदली गेली. मित्रानो लिहिण्याचे कारण एकच आपल्या स्वराज्यासाठी या अखंड महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या संभाजी महाराजांची स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेचे अखेरचे 7 एपिसोड नक्की बघावे.
      आपला राजा छत्रपती संभाजी महाराज... त्यांचं बलिदान सगळ्यापर्यंत पोहचण्यासाठी कृपया हा लेख जास्तीत जास्त शेयर करा. एक संभाजी महाराजांबद्दल आस्था म्हणून शेयर करा..
            🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत