दहीपोहे
दहीपोहे
साहित्य:
• १ कप जाड पोहे
• १/४ ते १/२ कप दुध
• १ टिस्पून मिरचीचे लोणचे
• ३/४ कप दही
• चवीपुरते मिठ
२ जणांसाठी
कृती:
• दुध गरम करून पोह्यांवर घालावे. मिक्स करून ५ मिनीटे ठेवून द्यावे. गरम दुधामुळे पोहे लगेच मऊ होतात.
• एका वाटीत मिरचीचे लोणचे आणि १ चमचा दही असे निट मिक्स करून घ्यावे. लोणच्यातील मिरची जरा चुरडून घ्यावी.
• दुध आणि पोहे गार झाले कि त्यात दही आणि मिरची लोणचे कालवलेले दही असे छान मिक्स करावे. गरजेपुरते मिठ घालावे. वाटल्यास बरोबर थोडे दही आणि अजून मिरचीचे लोणचे घ्यावे आणि सर्व्ह करावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा