New

अक्षय तृतीया,Akshaya Tritiya

  अक्षय तृतीया 

      ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक््य तृतीया हा महत्त्वा्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो या दिवशी नर नारायण या जोड देवतांची जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव
 जयंती असते.
       महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ आणि  पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभाचा अक्षयतृतीया हा शेवटचा दिवस असतो.

 ज्योतिष विषयक समजुती

 १. अक्षय तृतीयेला युग संयेतायेत सुरू झाले असे सांगितले जाते या दिवशी दुसऱ्या युगाला सुरुवात झाली होती ज्योतिषशास्त्रात कृत त्रेा द्तवापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणार्‍या काळाला  महायुग असे म्हणतात.
  ही चार युगे महा युगाचे चार चरण  असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला आधी तसेच देता युगाचा ( १२,९६०००सौर वर्षा एवढा त्रेता युगा चा  काळ)  प्रारंभ म्हणजे युगा दिवशी किती वैशाख शुद्ध  तृतीयेला येते.

 शेतीसंबंधी प्रथा


१ . मातीत आळी घालने व पेरणी:फी पावसाळा तोंडावर घेऊन  अक्षय तृतीया येते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय ्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मुक्ती के बद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मूर्ती के मध्ये आळी घालतात.कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे.

 महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते., पूर्वी तरी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.

 २. वृक्षारोपण:

    अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आहे करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर  रोवल्यास या वनस्पतीचा क्षय होत नाही. म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.

 धार्मिक समजुती:


           हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणती पापड, कुरडया इत्यादी वाढतात सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाई.
        या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय न संपणाऱ्या असे मिळते असा समज आहे. ज्वेलरी अक्षय तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुण लोकातून पृथ्वीवर येतात त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता दहा टक्क्यांनी वाढते अशी कल्पना आहे.
     

१.अर्थ:


 अक्षय तिथीच्या दिवशी गोदीत सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपा दृष्टीचा कधीही  क्षय होत नाही, अशी समजूत आहे.

 २.  मृतिका पूजन:


  सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्यु के मुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभव लक्ष्मी यांची प्राप्ती होते, अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून अशा मृत्तिकेची  उपासना करण्याचा दिवस.

  अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे:

-  या दिवशी आपल्याला जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.

- सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.

-  ब्राह्मण भोजन घालावे.

- या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.

- या दिवशी नवीन, वस्त्र शस्त्र दागिने विकत  घ्यावेत.

- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.

 शास्त्रांमध्ये अक्षय तृतीया:


- या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्री नारायण आच्या बंद देवळाचे दार उघडतात हे मंदिर अक्षय तृतीया ला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.

- नर- नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता.

- श्री परशुरामाचे अवतरण सुद्धा या दिवशी झाले होते.

- वृंदावनाच्या श्री बाके बिहारी च्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहा चे दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांने झाकलेली असतात

 अक्षय तृतीयेचे माहात्म्य


- जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापांतून मुक्त होतो.

- या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्ज दिले जाते.

:- शुभ कार्य या दिवशी होतात.

- श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते, की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे. देव पआणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय( अविनाशी) होते.

 इतर:


- या दिवशी बद्री धाम येथील बद्री नारायणा च्या मंदिरात सहा महिन्याच्या बंद कालानंतर  प्रथम प्रवेश मिळतो. आयोध्या जवळच्या वृंदावनात कुंजबिहारी श्रीकृष्ण मंदिराचे दरवाजे पण याच दिवशी  उघडले जातात. अक्षय तृतीया विष्णूचा एक अवतार समजल्या जाणार्‍या परशुरामाची जन्मतिथी आहे             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत