भाजणीचे थालीपीठ
भाजणीचे थालीपीठ बनवणे
साहित्य :
1. चार वाट्या बाजरी,
2. दोन वाट्या ज्वारी,
3. एक वाटी उडदाची डाळ,
4. एक वाटी चण्याची डाळ,
5. अर्धी वाटी गहू,
6. अर्धी वाटी तांदूळ,
7. अर्धी वाटी धने,
8. दोन चमचे जिरे,
9. तिखट, मीठ, हिंग,
10. तेल, हळद,
11. काळा (गोडा) मसाला,
12. कोथिंबीर.
कृती :
1. सर्व धान्ये, धने व जिरे हे सर्व भाजून घेऊन, एकत्र करून, तळून भाजणी तयार करावी.
2. धान्याच्या प्रमाणात कमी-जास्त करण्यास हरकत नाही.
3. जेवढी थालीपिठे करावयाची असतील, त्या प्रमाणात भाजणी घेऊन त्यात हिंग, हळद, काळा मसाला व चवप्रमाणे तिखट आणि मीठ व थोडे तेल घालून व पाणी घालून भाजणी मळून घ्यावी
4. तव्यावर तेल घालून लहान अगर मोठे पाहिजे त्या आकाराचे थालीपीठ लावावे.
5. त्याच्यावर बोटाने चार-पाच भोके पाडून, त्यांत तेल सोडून झाकण ठेवावे व मंद विस्तवावर भाजावे.
• टीप :
1. भाजणी तयार नसल्यास घरात जी पिठे असतील, ती पिठे मिसळूनही थालीपीठ केल्यास चांगले होते.
2. थालीपिठात कांदा चिरून घालावा व कांद्याचे थालीपीठ करावे.
3. वांगे भाजूनही या भाजणीच्या थालीपिठात घालतात.
4. थालीपिठात पाहिजे असल्यास चिमटीभर सोडा घाला, त्यामुळे ते रवाळ होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा