New

महाशिवरात्रीची व्रत कथा

महाशिवरात्रीची व्रत कथा 


shiv Night



           
 शंकराने पार्वतीला 'शिवरात्री'च्या व्रताची कथा सांगितली.

     ज्या ठिकाणी शंकराचे स्मरण चालू असते तेथे मुक्ती वास करीत असते, मोठमोठी संकटे नाश पावतात, हे शिवस्मरण सद्दाम केले, चेष्टा करता करतां केले, नकळत केले तरीही श्रीशंकर प्रसन्न होतो. लोखंडाला परीस लागला म्हणजे त्याचे जसे सोने होते, नकळत अमृत प्राशन केले तरी अमरत्व प्राप्त होते, योग्य औषधी न समजतां भक्षण केली तरी रोग नाहीसा होतो. वाळलेल्या गवताच्या गंजीवर एकाद्या बालकानें न समजतां ठिणगी टाकली तर ती गवताची रास जळून खाक होते. त्याप्रमाणे कळत नकळत कसेंही शिवनाम घेतले तरी पापांचा नाश होतो.

      विनोदाने शिवाचे नाम घेतले किंवा लोक शिवनामाचा जप करतात म्हणून एकाद्याने चिडून 'अरे हे कां सारखे 'शिवशिव' ओरडत आहेत. माझे डोके उठले आहे. शिव शिव म्हणून यांना काय मिळते कुणास ठाऊक ? असा त्रागा केला पण तसा त्रागा करतांना शंकराचे नांव नकळत घेतले; एवढेच काय मुलांची नांवे शंकराची ठेवली असल्याने त्यांना हांक मारतांना आपोआप नामस्मरण झाले तरीही भोळा शंकर प्रसन्न होतो.                                      त्यांतही महाशिवरात्रीच्या शुभदिनी उपवास व जागरण घडले, बिल्वपत्रांनी शंकराची पूजा केली गेली तर हजार जन्मांची पातके नष्ट होऊन जातात. जो शंकराला रोजबेल वाहतो तो स्वतः उद्धरून जातो; एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीच्या दर्शनाने इतरही उद्धरले जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी वशिष्ठ, विश्वामित्र यांच्यासारखे
श्रेष्ठ मुनी, यक्ष, गंधर्व, देव, देवी शंकराची पूजा करत असतात. कारण महाशिवरात्रीचे महत्त्वच आगळे आहे. 

सहज नामस्मरण घडले तरी पापी माणूस कसा पुण्यवान होतो त्याची एक कथा आहे-  

    जुनी गोष्ट आहे. त्यावेळी विंध्य पर्वतावर एक शिकारी रहात होता. हरणे, पक्षी, जंगली जनावरे मारावीत आणि त्यावर आपली उपजीविका करावी एवढेच त्याला कळत होते. याव्या नावावर पापे चढली होती. पण त्याभिल्लाला त्याची जाणीवही नव्हती. माघ महिना संपत आला होता, पण बोचरी थंडी अजूनही
बोचत होती. पोटाची खळगी भरायलाच हवी म्हणून हाशिकारी भल्या पहाटेला घरातून बाहेर पडला. धनुष्य, बाण,
जाळे आणि इतर हत्यारे घेऊन तो चालला होता. गांवाच्या अगदी टोकाला एक छोटेसे पण सुंदर शिवमंदिर होते. आज महाशिवरात्रीचा दिवस होता त्यामुळे आजुबाजूच्या खेड्यांतून अनेक लोक शंकराचे दर्शनासाठी देवळांत आले होते, मंदिर आंब्याचे टहाळे-कागदांच्या पताका लावून शृंगारले होते, कळसावर ध्वज फडफडत होता. दिवे लावून आरास केलीहोती, मध्यभागी पवित्र असें सुंदर शिवलींग होते. 

    लोक मोठ्या भक्तीभावाने पूजा करत होते. अभिषेक पात्रातून शिवलिंगावर पाण्याच्या धारा गळत होत्या. मंत्रघोष चालू होता. टाळमृदुंग हातात घेऊन भक्तजण कीर्तन करत होते. नाचत होते. देवळात दिव्यांची आरस केली होती. उदबत्ती कापूर यांचा सुगंध गाभाऱ्यात दरवळत होता. 'शिव शिव....सांब सदाशिव' अशा जयघोषाने सारे वातावरण भक्तीमय झालेले होते. या देवळापाशी आपला शिकारी येऊन पोहाचला. गर्दी पाइन तो थोडा थांबला व लोक काय काय करत आहेत हे बघू लागला. बराच वेळ गेला.  

    आज व्याधाला काहीच शिकार मिळाली नव्हती. सकाळ-पासून पोटांत अन्नाचा कण गेलेला नव्हता. काय करावे हे त्याला सुचेना! तेवढ्यात त्याला एक मोठे सरोवर दिसले. सरोवरांत कमळे फुललेली होती आणि सरोवराच्या काठी बिल्ववृक्षाची दाटी होती. झाडी इतकी दाट होती की, समोरचे
हाताच्या अंतरावरचेही काही दिसत नव्हते. चंद्राचे किरणही आंत प्रवेश करायला घाबरतील इतकी हिरवीगार झाडी सरोवराभोवती पसरलेली होती. आता तर रात्र गडद होत चालली, व्याध एका बेलाच्या झाडावर चढून बसला. सरोवराचे पाणी पिण्यासाठी एखादे जनावर येईल या आशेने धनुष्याला बाण लावून तो तयारीने बसला होता. पण पानांच्या दाटीमुळे त्याला समोरचे नीट दिसेना.

    मग त्याने आपले धनुष्य व बाण डाव्या हातात धरले आणि उजव्या हाताने समोरची पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. देवयोगाने त्याच झाडाखाली एक शंकराचे लिंग होते. व्याध बेलाची पानें तोडत होता व ती नकळत शंकराचे पिंडीवर पडत होती. शिकार न मिळाल्याने सकाळपासून उपास 'घडला होता. शिकारीची वाट बघतांना आपोआप जागरण 'घडत होते. बिल्वपत्रांनी शंकराची पूजा झाली होती आणि 'लोकांच्या मूर्खपणाला हसण्यासाठी 'शिव शिव हर हर-' असे म्हणत त्यांची नक्कल करत होता. 'एक प्रहर उलटला आणि व्याधाला जनावरांची चाहूल लागली. त्याने निरखून पाहिले. 

     एक सुंदर हरिणी सरोवराचे पाणी पिण्यासाठी आली होती. व्याधाने धनुष्याला बाण लावला आणि तो बाण सोडणार तोच ती हरिणी मनुष्य- वाणीने व्याधाला म्हणाली, बाण सोडू नको! मी तुझा कांही
अपराध केला आहे का ? मी गर्भिणी आहे. माझ्या पोटांतल्या कोवळ्या जिवांनी तुझे काय केले आहे ? गर्भवती हरिणीला मारलेस तर तुला फार मोठे पाप लागेल. शंभर बैल मारले तर गोहत्या केल्यासारखे होते. शंभर गोहत्या केल्या म्हणजे शंभर गायीना ठार मारले तर एक ब्राह्मण मारल्याचे पातक लागते. शंभर ब्राह्मण मारले तर एक स्त्रीचा वध केल्याचे पातक लागते. अशा शंभर स्त्रिया जो मारील, त्याला गुरुहत्या केल्याचे पातक लागते....आणि व्याधा; गुरुहत्येहूनही शंभरपट जास्त पातक एक गर्भिणी मारल्यामुळे लागते, म्हणून बाण सोडण्यापूर्वी नीट विचार कर.व्याध म्हणाला, ' हे बघ ! मला आज कडकडीत उपवास घडला आहे.

   माझी बायकापोरेही घरी उपाशीच झोपलीअसतील. पण तूं हरिणी असूनही शास्त्रांत पारंगत असल्या-
सारखी बोलत आहेस, याचे मला फार आश्चर्य वाटत आहे.तूं पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कसे प्राप्त झाले ?
हे जर तू मला सांगणार असशील तर मी तुझ्यावर दया करीन. त्याबरोबर ती हरिणी म्हणाली, 'व्याधा ऐक, मी शपथ घेते. ब्राह्मण कुळात जन्म मिळूनसुद्धा जो वेदांचा अभ्यासकरत नाही, स्नानसंध्या करत नाही, विद्या देतांना जो पैसे घेतो. ज्याला भजन पूजन आवडत नाही, त्याला लागणारेपाप माझ्या शिरावर राहील. दान देण्यासाठी कुणी तयार झाला तर त्यांत जो विघ्न आणतो, गुरूची निंदा करतो. शंकर-विष्णु यांची निंदानालस्ती करतो, ब्राह्मणांना दान देऊन ते पुन्हा हिसकावून घेतो, ऋषींची निंदा करतो, आपला धर्म सोडतो, भांडणे लावतो....ही पातके मला लागतील.-
    'देवळांत पुराण-कथा कीर्तन चालू असतांना जे विडा खातात त्यांच्या अंगावर कोड उठते. जे देवळांत रतिसुखात रमतात, पती-पत्नीत मुद्दाम भांडणे लावून देतात ते पुढील जन्मी नपुसंक म्हणून जन्म घेतात.'दुसऱ्याच्या वर्मावर जे मुद्दाम आघात करतात, ते कोवळे होतात. आपल्याला येत असूनही जो गुरु शिष्याला विद्या देत नाहीं तो पिंगळा होतो. जे ब्राह्मण अनुचित दान घेतात त्यांना गंडमाळा होतात. दुसऱ्याच्या गाई जे चोरून आणतात ते अल्पायुषी होतात. जो राजा प्रजेला उगाच छळतो तो पुढील जन्मी वाघ किंवा साप होतो. एखाद्या साधूचा उगाच छळ केला तर छळ करणाऱ्याचा निर्वंश होतो. घरात धान्य भरपूर असून पतीला जी चांगला स्वैपाक करून वाढत नाही किंवा व्रतवैकल्याचा मोठा थाटमाट करून पतीला अजिबात विचारत नाही अशा स्त्रीला वटवाघुळाचा जन्म येतो. नवरा दिसायला चांगला नाही. म्हणून ज्या स्त्रिया नवऱ्याला सोडून देतात त्या चालविधवा होतात. एवढेच नाही तर व्यभिचारही करतात, शेवटी वेश्या बनतात. ज्या स्त्रिया नवऱ्याची निर्भत्सना करतात त्या दासी बनतात. जे सेवक आपल्या धन्याचाविश्वासघात करतात त्यांना कुत्र्याचा जन्म येतो. नोकरापासून भरपूर काम करून घेऊन जो धनी त्याला पगार देत नाही,तो भिकारी होऊन भीक मागत दारोदार हिंडतो. 
     पतिपत्नींचा एकांत जो चोरून बघतो त्याची बायको पळून जाते आणि तो अन्नाला महाग होतो. जे करणी करतात ते भूत बनतात.पिशाच्च बनतात. जी स्त्री विटाळ घरांत कालवते तिचे पूर्वज नरकांत पडतात. तिच्या घरी देव किंवा पितर पायही ठेवत नाहीत. देवळातील दिव्यांचे तेल जे चोरून नेतात त्यांना मुलगा
होत नाही. स्वैपाक करतांना ज्या स्त्रिया चोरून खातात त्या मांजरी बनतात. आलेल्या अतिथीला शिळेपाके खायला घालून आपण स्वतः पंचपक्वान्नांचे जेवण करणाऱ्या स्त्रियांचे गर्भ आपोआप गळून पडतात. जी मुले आई-वडिलांना म्हातारपणी छळतात त्यांना. माकडाचा जन्म येतो. सासुसासऱ्यांना ज्या सुना उगाच त्रास देतात त्यांची मुलें। जगत नाहीत.


    ' 'व्याधा. मी जर परत आले नाही तर वरील सर्व पापे मला लागतील. आतां मला जाण्याची परवानगी दे.'व्याध म्हणाला, 'हे पतिव्रते, तू जा....आणि रात्र संपायच्या आंत परत ये.''व्याधा, तू पुण्यवान आहेस. तुला कलासनाथ पसल जाऊन परत येते.' असे म्हणून हरिणी निघून गेली. 
    आपल्या समोरची बिल्वदळे उजव्या हाताने तोडून व्याध खाली टाकतच होता. दोन प्रहर रात्र झाली होती. व्याधाने केलेल्या पापापैकी अर्धी पातके नष्ट झाली होती. 'हर हर या नावाची व्याधाला आवड उत्पन्न झाली होती. तो 'सांबसदाशिव हर हर महादेव' असे म्हणत म्हणत समोर टक लावून बघत होता. जागरण घडत होते. तेवढ्यात व्याधाला पुन्हा जनावरांची चाहूल लागली. आतां ही शिकार साधायचीच असे ठरवून व्याधाने. धनुष्याला बाण लावला. दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आलेली होती. भयभीत होऊन ती व्याधाला म्हणाली, 'जरा थांब, बाण सोडू नको. मरतांना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही. मी पतिसहवासासाठी आतुर झालेले आहे, कामामुळे माझे सारे शरीर व्याकुळ झाले आहे. मला थोडावेळ 'जाऊ दे, पतीला भेटन मी लगेच परत येते.
   ''धनुष्यबाण खाली ठेवन व्याध म्हणाला, 'हे हरिणी तुम्ही 'सर्व भाग्यवान आहात. तूं जरूर पतीला भेटन ये, पण जाण्यापूर्वी शपथ घेऊन जा. तुला शास्त्र-पुराणं माहीत आहेत.
तेव्हां आधी शपथ घे.
     व्याधा. विहिरी, तळी, सरोवरे, देवायाभोवतालची बाग जो नष्ट करतो त्याला लागणारे महत्पाप मला लागेल. क्षत्रीय असूनही जो युद्धाला भिऊन समरांगणातून पळ काढतो, वेदशास्त्र यांची निदा करतो, महापुरुषांनी जे पवित्र ग्रंथ लिहिले आहेत, त्याचीही निंदा नालस्ती करतो, संत, ऋषी, भक्त यांचा द्वेष करतो, शंकर आणि विष्णु यांची चरित्रे खोटी आहेत असें म्हणतो, त्याची पापे माझ्या मस्तकावर चढतील.
     हे निषादा, पुत्र आणि पुत्रवधू घरात उत्तम प्रकारे वागून आपले कर्तव्य करत असताही जे त्यांना त्रास देतात, छळतात, ते पुढील जन्मी अतिशय कुरूप होतात. त्यांना कुणी भिक्षा वाढायला तयार होत नाहीत. जे भाऊ आपापसांत भांडतात त्यांना माशांचा जन्म येतो. जो आपल्या गुरूचे उणे काढून चर्चा करत रहातो त्यांची संपत्ती नष्ट होते. जे वाटसरूंना लुबाडून त्यांची वस्त्रे-दागिने चोरून नेतात त्यांना पुढील जन्म स्मशानांतील डोंबाचा येतो आणि प्रेतावर घातलेली वस्त्रे ते नेसतात, पांघरतात. साधुपणाच्या नावाखाली जे अनाचार करतात त्यांना घुल्यांचा जन्म येतो. जी दासी स्वामीची मनापासन सेवा करत नाही तिला मगरीचा जन्म येतो. आणि जो स्वतःच्या कन्येची विक्री करून संपत्ती मिळवतो त्याला हिंस्र पशूचा जन्म येतो. आपल्या पतीची मनापासन सेवा करणाऱ्या पतिव्रतेला जो त्रास त यातना सोसाव्या लागतात, जो त्याला जन्मोजन्मी अनंत यातना सोसाव्या ला ब्राह्मण दुध-ताक-रस विकेल तो दारूड्या होतो.
    विव्दान  ब्राह्मणांचा जो मुद्दाम अपमान करतो तो ब्रह्मराक्षस होतो.दुसऱ्याने केलेला उपकार ज्याला आठवत नाही त्याला जंताचा घाणेरडा जन्म येतो. जो ब्राह्मण श्राद्ध पक्षाला जेवायला जाऊन त्याच दिवशी स्त्री समागम करतो त्याला  कुत्र्याचा, डुकराचा जन्म येतो. जो मुद्दाम खोटी साक्ष देतो त्याचे पितर नरकांत जातात. दोन बायकांशी विवाह करून तो त्यांतील एकीवर जास्त प्रेम करतो त्याला पुढील जन्म ‘गोचिडाचा' येतो. जो पाणी मुद्दाम अडवून ठेवतो त्याला 'मलमूत्र विसर्जन करतांना वेदना होतात. जो साधूंची निंदा करतो त्याचे दांत लवकर पडून जातात. जो देवळात बसून जेवण करतो त्याला क्षयरोग होतो.
   जो राजाची निंदा करतो त्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही. ग्रहणाच्या वेळेस जो जेवण करतो त्याला पित्तरोग होतो. दुसऱ्याची मुलें पळवून जो दूर देशांत नेऊन विकतो त्याला महारोग होतो. जी स्त्री सद्दाम गर्भ पाडते ती पुढीलजन्मी बंध्या होते. जो देवालयाची मोडतोड करतो त्याचे हातपाय मोडतात. आपल्या पत्नीचा अपराध नसताना तिला जो पताछळतो त्याला अपांगवात होतो. जो प्रामाणाचे अन्न हिसकावू 'पेतो त्याचा वंश कधीही वाढत नाही. गुरु, संत आणि आई वडील ह्यांची जो निंदा करतो तो तोतरा होतो. बोलतांना सदोदीत अडखळतो, जो ब्राह्मणाला मारहाण करतो त्याच्या सर्व शरीरात रोग उत्पन्न होतात. देवालयातले मोठमोठे वृक्ष
जो तोडतो तो पांगळा होतो. संसारात जो एकटाच चैन करतो, रंगेलपणे वागतो, दुसऱ्याची पर्वा करत नाही त्याच्या
अंगाला दुर्गधी येईल असा रोग होतो. ब्राह्मणाकडून घेतलेले कर्ज जो मुद्दाम फेडत नाही त्याचा बाप लहान-
पणीच मरतो. जो दान करत नाही तो पुढील जन्मी अन्नासाठी वणवण फिरतो. जो स्वतःच्या मुलाचाच द्वेष करतो
दरिद्री माणसांचे ठरत असलेले लग मोडतो त्याच्या पत्नीला मूल होत नाही. तिच्या पोटांत नुसताच गोळा वाढतो. जो पवित्र कथा ऐकत नाही तो बहिरा होतो. आईवडिलांना त्रास देणान्याचे कार्य होत नाही. एकच देव श्रेष्ठ मानणाऱ्याला एकत्र मुलगा होतो. जो गोवध करतो त्याला भांडकुदळ बायको मिळते. जो बैल मारतो त्याचा मुलगा मूर्ख निपजतो. मुक्या जनावराचे अन्नपाणी जो तोडतो त्याला मुकी मुलेच होतात. जो दसऱ्याच्या पतिव्रता स्त्रीवर डोळा ठेवतो त्याला कुरूप आणि तोंडाळ बायको मिळते. जो गुरूचा त्याग करतो तो पुढील जन्मी जन्मताच मृत्यू पावतो. जो सूर्यासमोर लध्वी करतो त्याचे लहानपणीच दांत पडतात आणि केस पांढरे होतात. आपल्या मृत बाळासाठी शोक करत असणारांना जे हसतात ते निपुत्रीक होतात,व्याधा. मी जर परत आले नाही तर वरील सर्व पापे मला लागतील. 'बरं जा.... पण लवकर ये' असे म्हणुन व्याधाने तिला परवानगी दिली....जलपान करून उड्या
भारतच ती निघून गेली.
      तेवढ्यात एक सुंदर हरीण पाणी पिण्यासाठी आले. व्याधाने धनुष्याला बाण लावताच हरीण म्हणाले, 'निषादा, माझ्या दोन्ही स्त्रिया पतिव्रता आहेत त्यांना विचारून मी येतो. मी शपथ घेऊन जातो.
 रंगात येऊन कीर्तन करणाऱ्या भक्तांच्या भक्तीत जो व्यत्यय आणतो त्याचा वंश वाढत नाही. शापापले काम सोडून जो दुसन्या जातीचे काम करू लागतो तो नरकांत पडतो. तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेल्या लोकांचे जो द्रव्य चोरून नेतो त्यांच्या सर्व अंगावर व्रण पडतात आणि तो नरकयातना भोगतो, जो एकादशी, शिवरात्र असे उपास करत नाही त्याचे हातपाय थकतात, शंकराची किंवा विष्णूची मूर्ती फोडणारा,भक्तांना त्रास देणारा, शिवमहिमा न मानणारा नरकातला कीडा होतो. आईवडलांना त्रास देणारा पिशाच होतो. गुरूचा द्रोह करणारा लगेच मरतो आणि भूत योनीत जाऊन कष्ट भोगतो. ब्राह्मणांचा आहार केवढा मोठा आहे असे म्हणून ईसणान्याच्या तोंडात रोग होतो व त्याला 'अब खाता येत नाही. गाय विकणारा, आपल्या कन्येचा विक्रय करणारा मांजर होतो आणि त्या रूपात आपली मुले आपण भक्षण करतो. जो आपल्या बहिणीकडे मुलीकडे किंवा पतिव्रता स्त्रीकडे कामदृष्टीने पहातो त्याला प्रमेह रोग होतो देवाची भांडी, अलंकार चोरणाऱ्याला पंडुरोग होतो. मित्राचा विश्वासघात करणाऱ्याला, आईवडीलांची हत्या करणाऱ्याला, गुरूला संकटात लोटून देणाऱ्याला या व पुढल्या जन्मांत असंख्य यातना भोगाव्या लागतात. अंगांत सामर्थ्य असूनही जो गोवध किंवा ब्राह्मण वध थांबवत नाही. ब्राह्मणाला बाहेर उपाशी बसवून स्वतः पंचपक्वान्नांचे जेवण करतो, त्याला पोटांतला आजार होतो. जेवण पचतच नाही. जो शिवकीर्तन ऐकताना कंटाळतो, शिवपूजन करत नाही त्याला कानाचा रोग होतो.वेदना होतात. ऐकू येत नाही. जे तीर्थप्रसादाचा त्याग करतात त्यांच्या नसा आंखडतात. व्याधा, अशा प्रकारची अनेक पापे मी जर परत आलो नाही तर मला लागतील....मला "जाऊ दे 
      मृगराजा जा....लवकर परत ये' असे म्हणून व्याघाने 'जय शंकर, हर हर महादवे' असा नामगजर सुरू केला. त्याचे डोळे भरून आले. हाताने बिल्वदले खाली टाकण्याचा चाळा सुरू होताच शिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी त्याला जागरण घडले, निरुपण ऐकायला मिळाले, चार वेळा शंकराचे पूजन झाले त्यामुळे मागील सातजन्मांची पातकेहीजळून भस्म झाली.'पहाट झाली. पक्षी किलबिल करू लागले. पूर्वेला तांबडे फुटले. साऱ्या विश्वावर कुंकवाचा सडाच पडला आहे अशी लाली पसरली.
     तेवढ्यांत आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली आणि तिला यमासारखा व्याध झाडावर बसलेला दिसला. त्याबरोबर ती केविलवाणे बघत म्हणाली, 'व्याधा, मला मारू नकोस. माझी छोटी पाडसे घरी आहेत. ती भुकेली असतील. मी त्यांना दूध पाजून लगेच परत येते मग तूंमला मार. व्याधाला तिचे बोलणे ऐकून फार आनंद झाला. कारणआसां ती काय बोलते ते ऐकायची त्याला उत्सुकता लागली होती. 'व्याध म्हणाला, 'तूं जरूर जा....पण शपथ घेऊन जा....
     'ऐक व्याधा, जो गुरांना खावयास योग्य असलेले गवत जाळतो, गाव जाळतो, गाईला आणि ब्राह्मणाला पाणी मिळू देत नाही त्याला क्षयरोग होतो. जो ब्राह्मणाची घरे लुटतो त्याचे पूर्वज नरकांत पडतात. आई-मुलांत, पति-पत्नीत जो भांडणे लावतो, देव माधणांना जो मान देव नाही, त्यांची निंदा करतो त्याचे यमराज हातपाय तोडतो. जो चोरी करतो. साधुसंतांचा सत्कार झाला तर ज्याला वाईट वाटते, त्याला डोळ्याचे 'आजार होतात. त्यांची दृष्टी अधू बनते. जे लोकांची पुस्तके'चोरून नेतात ते मुके होतात. जे रत्नांची चोरी करतात त्यांना अंधत्व येते. जे फार गर्व करतात त्यांना रेडयाचा जन्म येतो.
     भक्तांची जे उगाचच निंदा करतात त्यांच्या तोंडाला असाध्य रोग होतो व दुर्गंधी सुटते, जो आई-वडिलांना मारतो तो लुळा होतो. जो अतिशय कंजुषपणाने वागून पैसा नुसता साठवून ठेवतो, एक पैसाही खर्च झाला तर ज्याला वाईटवाटते तो महाभुजंग बनून धनाचे नुसते रक्षण करत बसतो. दाराशी आलेल्या भिक्षेकऱ्याला जो भिक्षा घालत नाही त्याच्यावर प्रत्यक्ष भगवान शंकर कोपतात आणि त्याच्या सर्व संपत्तीचा नाश होतो. जेवायला ताटावर बसलेल्या  ब्राह्मणाला जो हात धरून बाहेर घालवतो त्याच्यासारखा अधम दुसरा कुणीही नाही. पारध्या, मी जर परत आले नाही तर ही सर्व पातके मला लागतील.
     'हरिणीचे भाषण ऐकून गहिवरलेला व्याध मृदु स्वगत म्हणाला, 'हे माते, जा. घरी जाऊन मुलांना दूध पाजून परत ये. त्याबरोबर जलपान करून उड्या मारत हरिणी आपल्या बाळांकडे निघून गेली. थोडा वेळ गेला. पहिली हरिणी प्रसूत झाली होती. दुसऱ्या हरिणीने पतिसहवास लुटला होता. पतीला संतुष्ट केले होते. तिसऱ्या हरिणीने आपल्या बांलकांना दूध पाजून त्यांची भूक भागवली होती. मृगराजाने सर्वांचा निरोप घेतला आणि तो आपल्या तिन्ही स्त्रियांना म्हणाला, 'चला लवकर ! आपण व्याधाला शब्द दिला आहे,'
       'आम्ही पण तुमच्याबरोबर येणार. छोटी पाडसेही म्हणाली आणि मग सर्वजण धावत धावत सरावरापाशी आली. मृगराज म्हणाला, 'व्याधा, सर्वाच्या आधी मला बाण मार. माझा प्राण घे.' मृगराजाला धक्का देऊन त्याच्यापुढे येत हरिणी म्हणाली, 'व्याधा, आधी आमचा तिघींचा प्राण घ. पतीच्या आधी मरण येणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. 'व्याधा, आई-वडिलांच्या मागे राहून आम्ही छोटी मुले काय करणार ? त्यापेक्षां तूं आधी आम्हास मारून टाक.' छोटे पाडस कोवळ्या आवाजात उद्गारले,आणि मरणासाठी त्यांच्यात चाललेली चढाओढ पाहून व्याधाचे हृदय भरून आले. डाळ्यातून अश्रुधारा वाह लागल्या.
    व्याध झाडावरून खाली उतरला आणि हरिणाचे पाया पडून म्हणाला, 'मी तुमच्या दर्शनाने आज धन्य झालो. तुमच्या तोंडून वेदान्त ऐकून माझी सर्व पातके जळून भस्म झाली. मी शुद्ध झालो. पावन झालो. माझे माता-पिता गुरु सर्व काही तुम्हीच आहात. हा संसार-बायका-मुले हे सर्व अळवावरचे पाणी आहे, सारी माया खोटी आहे. मी निरिच्छ। झालो आहे, श्रीशंकराचे पवित्र चरण मी कधी पाहीन असे मला झाले आहे.'व्याध असें बोलतो आहे तोच आकाशातून दिव्य विमानखाली उतरले. विमानांत शिवगण यसलेले होते, त्यांची कांती झळकत होती. वाघाची कातडी त्यांच्या अंगावर शोभत होती. चारी दिशांत त्यांचे तेज मावत नव्हते. किन्नर अनेक वाधें वाजवत होते. यक्ष गोड आवाजांत गाणी म्हणत होते. स्वर्गातले देव आकाशांत येऊन सर्वांवर पुष्पवृष्टी करत होते.
    हरिणांचे कुटुंबही ह्या वर्षावांत आनंदाने न्हात होते. हळू हळू सर्व हरणांना आपले मूळस्वरूप प्राप्त झाले. व्याधाने  त्यांना साष्टांग नमस्कार घातला व मुखाने 'जय जय शिव  हर हर' असा जयघोष सुरू केला. परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते. त्याप्रमाणे व्याधाचा उद्धार झाला. त्याला शिवगणांसारखे दिव्यरूप प्राप्त झाले. शिवगणांनी मोठ्या आदराने व्याधाला विमानात बसवले. रंभा आपल्या परिवारा- सह विमानांत बसली. सर्वजण व्याधाची स्तुति करत होते. व्याधाला शंकराच्या पवित्र चरापाशी जागा मिळाली. अक्षय स्थान मिळाले.
 आजही आकाशात आपल्याला हरिणे आणि व्याधाची चांदणी आपल्या तेजाने तळपतांना दिसतात. 
     अशी ही कथा सर्वांनी नेहमी मनापासून ऐकावी. महाशिवरात्रीचे व्रत खरोखर फार मोठे आहे. कथा ऐकणाऱ्याची सर्व पापे नाहिशी होतात. कैलासनाथ शंकराच्या पवित्र चरणाभोवती भुंग्याप्रमाणे रुंजी घालून शिवनामाचा सुगंधकवी श्रीधर यांस प्राप्त झाला आहे. अशी ही स्कंदपुराणातील कथा सज्जन लोकांनी नेहमी वाचावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत