होळी आणि रंगपंचमी १० मार्च २०२०
रंगांनी खेळा होळी आपलं नशीब नक्की उजळेल!
होळी 9 मार्च 2020
होलिका दहन मुहूर्ता- 18:22 ते 20:49
भद्रा शेपटी- 9:37 ते 10:38
भद्रा मुख- 10:38 ते 12: 19
रंगपंचमी होळी - 10 मार्च
पौर्णिमेची तारीख प्रारंभ- 03:03 (9 मार्च)
देशभरात होळी आणि रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल
या वर्षी रंगपंचमी तुम्हाला लवकर साजरी करायला मिळणार आहे. कारण, २०२० या वर्षात रंगपंचमी १० मार्च रोजी आहे. या दिवशी मंगळवार आहे. तर, होळी ९ मार्च २०२० रोजी येणार आहे. या दिवशी सोमवार आहे.
देशभरात होळी आणि रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल.प्रत्येक राज्यात हा सण साजरा करण्याची परंपराआहे. पद्धत वेगवेगळी असल्याचं पहायला मिळतं. तसेच काही ठिकाणी नावंही वेगळी देण्यात येतात. या दिवशी महिला सुख, शांती, समृद्धी, मुले प्राप्ती इत्यादींसाठी होळीची पूजा करतात. होलिका दहनसाठी सुमारे महिनाभरापूर्वी तयारी सुरू केली आहे. काटेरी झुडुपे किंवा लाकूड गोळा केल्यावर होळीच्या शुभ दिवसात होळी जाळली जाते.
रंगाचा उत्सव म्हणजेच रंगपंचमी. या सणाला धुळवड, धुलीवंदन असंही म्हटलं जातं. रंगपंचमी केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा सण केवळ हिंदू बांधवच नाही तर विविध धर्मातील नागरिक सुद्धा साजरा करतात.रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी साजरी करण्यात येते. होळीच्या दुसऱ्यादिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येते. ग्रामिण भागात तर रंगपंचमीचा उत्साह पाच दिवस सुरु असतो. लोक एकमेकांवर रंगांची उधळण करतात, होळीची गाणी लावली जातात, ढोल वाजवले जातात आणि लोक नाचतात सुद्धा.
| holi |
सूर्यास्तापूर्वी होलिका दहनचा भोंगा काढण्यास मनाई आहे कारण आयुष्यात बरीच दुर्दशा होण्याचे कारण खरोखरच असू शकत नाही. हे सूर्यास्तानंतरच पौर्णिमा तिथीवर एका विशिष्ट वेळी केले पाहिजे. होलिका दहनचा विधी करण्यासाठी चांगला मुहूर्त निवडणे फार महत्वाचे आहे. रात्री आणि दिवस एकमेकांना भेटतील असा विश्वास असताना आदर्शपणे प्रदोष कालावर सादर केला पाहिजे. भद्रा तिथीपर्यंत होलिका दहनचा विधी करण्यास मनाई आहे. तसेच, त्याच गोष्टीसाठी अचूक वेळ संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात बदलते.
रंगपंचमी आणि धुळवड या तिन्हींना मिळून ‘होळी’ म्हटले जाते,
रंगपंचमी आणि धुळवड या तिन्हींना मिळून ‘होळी’ म्हटले जाते, ही आणखी एक गंमतच आहे. वास्तविक फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते. त्यानंतर दुसर्या दिवशी धुळवड असते. फाल्गुन वद्य पंचमीला रंग उधळण्याचा कार्यक्रम असतो; म्हणून ती रंगपंचमी असते; पण या तिन्हींना होळीच म्हटले जाते. होळी मुळात चालू कशी झाली, याची कथा पुराणात आहे. हिरण्यकश्यपू या दैत्याला आपला मुलगा प्रल्हाद याचे ‘नारायण वेड’ सहन झाले नाही आणि त्याने त्याला मारायचे ठरवले. त्यासाठी त्याने आपल्या बहिणीलाच पाचारण केले. तिचे नाव ‘होलिका’ होते. ती क्रूर होती. प्रल्हादाला मारण्यासाठी होलिकेने अग्निकुंड प्रज्वलित केले आणि ती त्यात प्रल्हादाला ढकलायला लागली; पण त्या प्रयत्नांत तीच जळली. त्या वेळी प्रल्हादाच्या पाठीराख्यांनी हर्ष व्यक्त केला. या होलिकेवरून आणि या घटनेवरून ‘होळी’ सणास प्रारंभ झाला. हा सण, म्हणजे सुष्टांचा दृष्टांवर विजय होय. आज या कथा, कल्पना जुन्या बुरसटलेल्या समजल्या जातात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा