New

शेवयांचा उपमा

शेवयांचा उपमा


साहित्य:                                                           
• १ कप शेवया
• २ कप गरम पाणी
• १/२ कप किंवा थोडे कमी मटार दाणे
• १-२ हिरव्या मिरच्या
• चवीप्रमाणे मीठ, साखर
• १ टेबलस्पून लिंबाचा रस
• १ टेबलस्पून तेल
फोडणीसाठी
• जिरे
• मोहरी
• हिंग
• १/२ टीस्पून उडीद डाळ

कृती:
• शेवया तेल न घालता कढईत थोड्या लालसर रंगावर भाजून घ्या.
• नंतर त्या बाजूला काढून ठेवा आणि त्याच कढईत तेल तापवून जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घाला.
• मोहरी थोडी तडतडली की त्यात उडीद डाळ घालून तांबूस रंगावर भाजू द्या. त्यातच मिरची घाला.
• नंतर त्यावर मटारचे दाणे घालून बारीक गॅसवर २-३ मिनीटे परतावा.
• त्यावर भाजलेल्या शेवया घाला व २-३ मिनीटे परता. चवीप्रमाणे मीठ घालून वरून दीड कप गरम पाणी ओता. मिश्रण नीट हलवून झाका.
• शेवयी शिजली नाही आणि पाणी आटले तर उरलेले पाणी घालून पुन्हा झाकून ठेवा.
• शेवयी जरा फ़ुलल्या सारखी वाटली की झाकण काढून ठेवा.
• त्यावर लिंबाचा रस आणि साखर घालून नीट मिसळावा.
• उरलेले पाणी आटवून टाका.
• शेवयाचा उपमा तयार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत