रायगड-रोप वे
रायगड-रोप वे
आपण टिव्हीवर रोप वे पाहतो. गजरात सीमेवरील सापुतारा व उत्तरांचल
![]() |
| रायगड-रोप वे |
सकाळी सहाच्या सुमारास किंवा त्याआधी मुंबई, ठाणे, डोंबिवली,
कल्याण, भिवंडी येथून आपण निघालात तर साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान आपण रोपवेच्या पायथ्याशी सहज पोहोचता. पायथ्याशीच रोप वे उभारणाऱ्या व्ही.एम. जोग कंपनीने सुंदर असे उपहार गृह उभारले आहे. तेथे नाश्ता आणि शाकाहारी व मांसाहारी भोजनाची सोय उपलब्ध आहे. रोप वे चे तिकिट १२० रुपये प्रतिव्यक्ती आहे.
या तिकिटामध्ये पायथ्याशी उभारण्यात आलेले ऐतिहासिक वस्तु
संग्रहालय पाहणे. त्यातील ऑडियो. व्हिडियो शो पाहणे, रोप वेने वर जाणे. वर गेल्यावर रायगड किल्ला दाखविणारा गाईड उपलब्ध करुन देणे व रोप वेने खाली येणे या सर्व बाबींचा खर्च समाविष्ट आहे. साडेचार ते पाच मिनिटात आपण रोप
वेने वर जातो आणि तेवढ्याच काळात खाली येतो. गडावर पोहोचलो की, त्यांचा
वाटाड्याही तयार असतो. चार तासामध्ये तो आपल्याला संपूर्ण रायगड किल्ला
दाखवितो. शिवबांच्या काळात घडलेल्या इतिहासाचे स्फुल्लिंग त्याच्या प्रभावी
वाणीतून आपण ऐकतो तेंव्हा वाटते हा साधा वाटाड्या नाही तर याच्या मुखातून
खुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे किंवा कालपुरुषच इतिहासाची पाने आपल्यासमोर
खुली करतो आहे. आपल्या सोबत जर वयोवृद्ध किंवा विकलांग अशा व्यक्ती
असतील तर त्यांना रोप वेने वर गेल्यानंतर लागणारा छोटासा चढ चढून जाता यावा
यासाठी यांत्रिक डोली देखील उपलब्ध आहे. येथे एमटीडीसी व जोग कंपनी यांचे
सुट्स देखील उपलब्ध आहेत त्याचे बुकिंग मुंबई व पुणे येथे होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा