New

भंडारदरा

भंडारदरा


ज्याना बीच एन्जॉय करण्याप्रमाणेच धरणातील जलाशय आणि धबधबा
भंडारदरा
एन्जॉय करायचा आहे त्यांच्यासाठी भंडारदरा आणि रंधा धबधबा म्हणजे एक पर्वणीच ठरेल. मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी शहराकडे जाणारा फाटा पकडलाकी, आपण भंडारदऱ्याच्या मार्गाला लागतो. हा रस्ता काहीसा अवघड आहे कारण तिथे सध्या घोटी शिर्डी हा नवा राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे बरीच डायव्हर्शन ओलांडली की आपण मुख्य रस्त्याला लागतो. जसे जसे आपण
भंडारदऱ्याच्या जवळ येऊ लागतो तसे हवामान थंड होऊ लागते. मन प्रसन्न होते.रस्त्यात लागणारे छोटे छोटे घाट त्यांच्याकडे वरुन वळणे घेत जाणारे नागमोडी शांत रस्ते, माकडांच्या झुंडी, पक्षांचा किलबिलाट व दोन्ही बाजूला पसरलेली शेते
     अशा वातावरणातून आपण भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी जाऊन पोहोचतो.
शेंडी या गावाला लागूनच भंडारदरा धरण आहे. प्रवरा नदीवरील हे धरण ब्रिटीशांनी
बांधले. हे धरण म्हणजे दुसरा सागरच वाटतो. जेंव्हा त्याचे दरवाजे उघडतात
त्यावेळी असे वाटते की, दुधाचा फेसच अखंड वाहतो आहे. भंडारदयाचे धरण
पाहिल्यानंतर तेथून दहा किलोमीटर अंतरावर रंधा धबधबा आहे. त्याचे वैशिष्ट्य
म्हणजे इतर धबधबे आपण तळभागापाशी उभे राहून पाहतो. तर हा धबधबा वरुन
पाहता येतो. धरणामध्ये विसावलेली प्रवरेचे पाणी, धरणाच्या दरवाजातून बाहेर
पडल्यावर फेसाळत उसळणारे व पात्रातून संथपणे वाहणारे पाणी आणि धबधब्यामध्ये
रौद्र स्वरुपात चारशे फूट खोल दरीत कोसळणारे प्रवरेचे पाणी अशी ही चारही रुपे
प्रत्येकाला थक्क करुन टाकतात. धबधब्याच्या जवळपास लोकवस्ती नाही परंतु
भजी, भेळ, चहा आदी वस्तु विकणारे लहान, मोठी दुकाने आहेत. भंडारदरा हे
महामार्गावरील घोटी फाट्यापासून ३१ कि.मी.वर आहे. रेल्वेने अथवा एसटीने
घोटी अथवा इगतपुरीला पोहोचून आपण भंडारदयाला जाऊ शकतो. भंडारदरा
ते रंधा या मार्गावर एसटी-रिक्षा-टेम्पो सायंकाळपर्यंत उपलब्ध आहे. एमटीडीसी
तसेच पाटबंधारे खाते यांची गेस्ट हाऊस येथे आहेत. त्याचे आरक्षण मुंबईत होऊ
शकते. रत्नगड हा किल्लाही येथून जवळच आहे. तसेच घाटघर वीज प्रकल्पही
बघण्यासारखा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत