मुरुड-जंजिरा
मुरुड-जंजिरा
आयुष्यात एकदा तरी मुरुड-जंजियाला गेलेच पाहिजे. राजपुरी गावाच्या अगदी।
जवळ हा बीच असल्यामुळे गावालगतचा बीच एन्जॉय करण्यातला आनंद आपण
लुटू शकता. तसेच इतिहास प्रसिद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांनाही अजिंक्य
ठरलेला असा मुरुड-जंजियाचा जलदुर्ग पाहणे हा आयुष्यातला एक थरारक अनुभव
असतो.
![]() |
| मुरुड-जंजिरा |
मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोबिवली आदी शहरातून मुरुडला जाणारी पहाटेची किंवा सकाळची पहिली एसटी पकडायची आणि साधारणत: ११ वाजेपर्यंत मुरुडला पोहोचायचे. मुरुडच्या आगारासमोर हॉटेल पंचरत्न आहे इच्छा असल्यास तेथे अत्यंत चविष्ट असा नाश्ता घ्यायचा. तो इतका रुचकर असतो की जेवायला पुन्हा येथेच यायचे असे ठरवूनच आपण बाहेर पडतो. रिक्षा करुन राजपुरी गावात गेले की, समोरच मुरुडचा बीच दिसू लागतो. डाव्या बाजूला मखमली वाळूचा बीच आणि उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो की, समोर दिसणारा मर्दानी जंजिरा किल्ला पाहिला की, मुरुडला येण्याच्या श्रमाचे सार्थक होते.
बीचवरल्या सागराशी मनसोक्त दोस्ती केल्यानंतर आपल्याला ओढ लागते ती किल्ल्याची. या किल्ल्याचे प्रवेशद्वार कोठे आहे हे कळूनच येत नाही. जेंव्हा तुम्ही किल्ल्याकडे घेऊन जाणाऱ्या बोटीच्या जेटीवर येता तेव्हा तिथे तुम्हाला इंजिनावर चालणाऱ्या आणि शिडावर चालणाऱ्या अशा दोन बोटी दिसतील. आपणाला जर आयुष्यातला सागरी थरार अनुभवयाचा असेल तर आपण शिडाच्या नौकेत बसावे. वाऱ्याच्या गतीनुसार नौकेला बसणारे धक्के आणि तिचा मार्ग बदलण्यासाठी तिचे शीड जेंव्हा खलाशी बदलतात त्यावेळी आपल्या काळजामध्ये क्षणभर धस्स होतं. कारण शिड बदलताना लाटांवर नौका इतक्या जलद गतीने डोलते की वाटावे आता सारे संपले. किल्ल्यामध्ये बुरुज, तोफा, कोठारे, महाल यांचे अवशेष आहेत.
भर सागरात असलेल्या किल्ल्यात गोड्या पाण्याचे तलाव आहेत.
किल्ला पाहून मनामध्ये शिवबांच्या स्मृती जाग्या होतात आणि त्याचवेळी मनाला परतीचे वेध लागलेले असतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा