अलीबाग फोर्ट
अलिबाग
किल्ला पण पाहायचा, समुद्रातही पोहायचे किंवा![]() |
| अलीबाग फोर्ट |
ठाणे, पुणे या महानगरातून व महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख शहरातून अलिबागला एसटी सेवा आहे.
लांबच्या अंतराहून येणाऱ्या मंडळींनी भल्या पहाटे अलिबागला पोहोचेल अशी बस निवडावी तर मुंबई, ठाणे परिसरातील मंडळींनी सकाळी ९ पर्यंत अलिबागला पोहोचता येईल अशा बेताने निघावे.पोहोचल्यावर चहा, कॉफी याच्या सवयी विसरुन समोर दिसणाऱ्या नारळ पाणी वाल्याकडून हिरवेगार शहाळे सोलून घ्यावे आणि खरे ताजे नारळ पाणी कसे असते याचा अनुभव घ्यावा.
ज्याने कोणी हे पाणी चाखले असेल तो आयुष्यात महानगरातील नारळ पाण्याला तोंड लावणार नाही.थोडेसेरिक्षाने गेलात कि अलिबागचा किनारा दिसू लागतो. उसळलेला सागर आणि त्याच्या लाटांच्या पलिकडे
असलेला अलिबागचा किल्ला आपल्याला खुणावू लागतो. भरती असेल तर तुम्हालाफक्त सागराशी सावधगिरीने खेळता येते. आणि ओहोटी असेल तरच किल्ल्यात जाता येते. किल्ल्यात जाण्याच्या आणि येण्याच्या वेळा या ठरलेल्या आहेत.त्याचवेळी जावे आणि यावे लागते अन्यथा भरती आल्यास किल्ल्यात अडकून पडण्याची वेळ येते.
किल्ला पाहायचाच असेल तर ओहोटी येईपर्यंत थांबावे लागते. या शहरात निवासाच्या आणि भोजनाच्या अत्यंत उत्तम अशा सोयीदेखील आहेत. समुद्रात डुंबण्याची मौज अनुभवल्यानंतर सागराच्या ओहोटीला काही तासांचा अवधी असेल व नंतर किल्ला पहायचा असेल तर मधल्या काळात आपण येथली विश्वविख्यात वेधशाळा पाहणे आणि कान्होजी आंग्रे यांच्या समाधीचे दर्शन घेणे या बाबी सहज पूर्ण करु शकतो. या बीचवर आजवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत अर्थात त्याला काही मंडळींचा अति उत्साह, बेफिकीरी कारणीभूत होती. आपण सावधगिरी बाळगली तर हा बीचही मस्त एन्जॉय करता येऊ शकतो. मुंबई, ठाणे, कल्याण येथून अलिबाग हे अंदाजे १०० कि.मी. अंतरावर आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा