बारवी डॅम (अंबरनाथ)
बारवी डॅम (अंबरनाथ)
ज्यांना धरणाच्या पाण्यात (सावधगिरीने) डुंबण्याची आणि जंगलाच्या वाटातून![]() |
| बारवी डॅम (अंबरनाथ) |
एक भन्नाट मजा आहे. या धरणाच्या पाण्यात अनेक भोवरे आहेत. त्यामुळे त्यामध्ये
पोहण्याचे साहस सहसा कोणी करु नये. असे प्रारंभीच सुचवावेसे वाटते. अंबरनाथ
आणि बदलापूर या उपनगरीय रेल्वे स्थानकापासून बारवी डॅम तसा जवळ आहे.
त्यामळे सकाळच्या लोकलने तेथे पोहोचणे उत्तम. जर स्वत:चे वाहन असेल तर
सकाळी लवकर निघून रस्तामार्गे अंबरनाथ किंवा बदलापूर मार्गे जाणे योग्य ठरते.
अन्यथा एसटी आहेच. नागमोडी वळणांचा रस्ता पार करीत आपण जेव्हा धरणाच्या
माथ्याशी पोहोचतो त्यावेळी आपल्याला बारवी धरणाचा गच्च भरलेला जलाशय
दिसू लागतो. रस्त्याने जाताना एखादा मोर किंवा लांडोर तसेच जंगली रान कोंबडी,
मुंगूस एखादा सर्प किंवा अजगर, तरस हेदेखील आपल्याला रस्त्यातून आडवे जात
दर्शन देतात. परंतु त्यांच्या दर्शनाने मन भयभीत न होता आपण त्यांच्या निवासस्थानी
म्हणजेच रानात अथवा अरण्यात आल्याची खूण पटते. धरणातल्या पाण्याशी थोडी
मौज-मजा केल्यानंतर सोबत डबा आणला असेल तर पोटोबा करणे योग्य ठरते.
जर घरातून धावपळीत निघाला असाल तर वाटेमध्ये लागणारी गार्डन रेस्टॉरन्ट
आपल्या भुकेची काळजी घ्यायला समर्थ असतात. मात्र प्रत्यक्ष धरणाजवळ हॉटेल्स
नाहीत. तसेच लोकवस्तीही नाही. धरण पाहून झाल्यानंतर आपण अंबरनाथचे
प्रसिद्ध शिवमंदिर पाहू शकतो. प्राचीन शिल्पकलेचा अप्रतिम आविष्कार असलेल्या
या मंदिराचे दर्शन घेणे ही भाविकांसाठी फार मोठी पर्वणीच ठरु शकते. अलिकडच्या
काळात या मंदिराच्या परिसराच्या सुशोभिकरणालाही प्रारंभ झाला आहे. या मंदिरातील
शिवलिंगाचे महत्त्व ज्योतिर्लिंगाइतके आहे. शिवरात्रीला येथे मोठी यात्राही भरते.
महाराष्ट्रातील जी प्रमुख शिवमंदिरे आहेत त्यातील हे एक मंदिर आहे. अंबरनाथला
पोहोचण्यासाठी पुणे व त्यापलिकडच्या मंडळींनी कर्जत येथे उतरुन कल्याणकडे
येणारी लोकल पकडावी तर मुंबई, ठाणेकर मंडळींना लोकल उपलब्ध आहेच.
कल्याणहून अंबरनाथला एसटी देखील आहे. तेथून किंवा बदलापूरहून डॅमला
एसटीने जाता येते. हे अंतर पाऊण तासाचे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा