महड-पाली
महड-पाली
एवढेच नव्हे तर कधी श्रद्धा म्हणून तर कधी चेंज म्हणून एखादी अध्यात्मिक
सहल काढायलाही हरकत नसते. यामुळे घरात जर वृद्ध मंडळी असतील तर
त्यांनाही बरे वाटते. आमच्याही मनाचा आणि आवडी-निवडीचा विचार घरातली
तरुण मंडळी करतात व आम्ही जसे त्यांच्या पिकनिकमध्ये वयोमान विसरुन सहभागी
होतो तशी तीही आम्हाला हव्या त्या ठिकाणी सहल काढतात. या भावनेने ती
सुखावतात. अशी एखादी धार्मिक सहल काढण्यासाठी महड आणि पाली ही दोन
ठिकाणे अगदी उत्तम आहेत.
विशेष म्हणजे येथील गणराय अष्टविनायकापैकी असल्याने संकष्टी अथवा
विनायकी चतुर्थीचा दिवस साधून जर सकाळीच घराबाहेर पडले तर या दोन्ही
गणरायाचे दर्शन सहज घेता येते. खोपोली हे मुंबई-पुणे महामार्गावर असलेले महत्त्वाचे
शहर आहे. तेथून महड आणि पाली या दोन्हीही देवस्थानाना जाण्यासाठी एसटी
व खाजगी वाहने उपलब्ध असतात. महडचे देवस्थान महामार्गापासून जवळच
आहे. तर पालीसाठी मात्र आपल्याला महामार्गापासून खूप आत जावे लागते. महडच्या
देवस्थानाभोवती गाव किंवा मोठी लोकवस्ती नाही त्यामुळे आधी महडच्या गणरायाचे
दर्शन घ्यावे व मग पुन्हा खोपोलीला येऊन पालीला जाणारी एसटी अथवा वाहन
पकडावे हे उत्तम. पाली येथील गणरायाचे मंदिर गावातच आहे. त्यामुळे येथील
दर्शन घेण्यास सायंकाळी थोडा उशीर जरी झाला तरी चालू शकते. तसेच मंदिर
गावात असल्याने जेवणाच्या व विश्रामाच्या सुविधादेखील येथे उत्तम आहेत. ही।
दोन्ही मंदिरे आपापल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. महडच्या मंदिरामध्ये काहीशी
विरक्ती जाणवते. तर पालीचा गणराय हा अनेक अलंकारांनी आणि कौटुंबिक
वातावरणाने अलंकृत झाल्यासारखा भासतो. पालीचे मंदिरही एखाद्या नागर
देवस्थानासारखे आहे. या दोन्ही ठिकाणी आपण गणरायासमोर नतमस्तक होतो.
मंदिराभोवतालची शांतता आणि भक्तिमय वातावरण येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या
मनावरील रुटीनचे मळभ झटकून टाकते. सर्वच वयोगटातील मंडळींनी या
देवस्थानांना अवश्य भेट द्यावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा