काशीद बीच
| काशीद बीच |
काशीद आणि नांदगांव
ज्यांना एकाच दिवसात दोन बीच एन्जॉय करायचे असतील त्यांच्यासाठीकाशीद आणि नांदगांव येथील दोन समद्र किनारे म्हणजे नंदनवनच म्हटले पाहिजे.
या बीचचे वैशिष्ट्ये म्हणजे तेथून मुरुडला जाणारा महामार्ग अगदी स्पष्ट दिसतो.
रुपेरी वाळू आणि माडांचे बन याने हे दोन्हीही किनारे समृद्ध आहेत. मुंबई आणि ठाणे येथून या दोन बीचचे अंतर दिडशे ते पावणेदोनशे कि.मी. आहे. हे दोन्ही
बीच अगदी जवळ आहेत. मात्र त्यांच्याजवळ लोकवस्ती अथवा गाव नसल्यामुळे जेवणाखाण्याची सोय आपल्याला डव्याच्या रुपाने सोबत न्यावी लागते किंवा त्याच्या अलिकडे रेवदंड्यातील अथवा
रस्त्यामध्ये लागणाऱ्या एखाद्या हॉटेलमध्ये ती करुन घ्यावी लागते. हे दोन्ही बीच
वस्तीपासून लांब असल्याने तेथे स्वच्छता खूप आहे.
मुंबई, ठाणे येथून जर आपण पहाटे पाचच्या सुमारास निघालो तर बीचवर साडेदहा
अकरा पर्यंत अगदी सहज पोहोचतो. आणि परतीसाठी बीचवरुन चार ते पाचच्या
दरम्यान निघालो तर आपल्या शहरामध्ये रात्री १० पर्यंत अगदी आरामात पोहोचू
शकतो. अत्यंत निवांत अशा बीचवर सागरात डुंबण्याचा आनंद खूपच वेगळा
असतो. सागराच्या लाटांची आणि वाऱ्याचा गाज सोबत रेशमी मुलायम वाळू अशा
वातावरणात आपण रोजचे सारे ताणतणाव पार विसरुन जातो. नांदगांवच्या बीचच्या
जवळच एकेकाळी येथे राज्य करणाऱ्या राजाचा सुंदर असा राजवाडा देखील
आहे. जे इतिहासप्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा राजवाडा पाहणे म्हणजे एक पर्वणीच
ठरते. या दोन्ही बीचवर होणारा सूर्यास्त पाहणे हेदेखील एक अविस्मरणीय असे
दृश्य आहे. भरतीच्या काळात या बीचवर सागराच्या लाटांशी खेळणे व हळूहळू
सागरामध्ये मावळणारा सूर्य जेव्हा आपण पाहतो त्यावेळी आपण विस्मयचकीत
होतो. सोबत जर भरपूर कंपनी असेल तर तिच्या जल्लोषपूर्ण पिकनिकसाठी या
बीचसारखे दुसरे बीच नाही. या ठिकाणी आपण सुटीचे दिवस टाळून जर आलो
तर कुठे मिळणार नाही अशी प्रायव्हसीही मिळू शकते. त्यामुळे क्रिकेटचा किंवा
बीच व्हॉलिबॉलचा मस्त डावही आपण रंगवू शकतो. मुरुडला जाणाऱ्या रस्त्यावरच
हे बीच असल्याने मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली येथून जाणाऱ्या
एसटीने आपण बीचवर सहज जाऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा